नवी दिल्ली : अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यावर आणि पंतप्रधानाच्या आंधप्रदेश संदर्भातील उत्तरानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 'बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतेय... मागील चार वर्षात तब्बल २९ वेळा दिल्लीत गेलो होतो. पण सरकारचे दुर्लक्ष कायम आहे', अस सांगत मुख्यमंत्री नायडू यांनी आज दिल्लीत दाखल होत सर्व उत्तरं देण्याचा चंग उतरवलाय. नायडू दिल्लीत आल्यावर पक्षांची पुढची भूमिका स्पष्ट करतील, असे टीडीपीच्या खासदारांनी म्हटलंय
लोकसभेत विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने १२६ जणांनी तर विरोधात ३२५ मते मिळाल्याने मोदी सरकारविरोधातला विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. तेलुगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आला होता.
हा प्रस्ताव जिंकल्यानंतर, आमच्याकडे केवळ सभागृहाचाच नव्हे तर १२५ कोटी जनतेचाही विश्वास आहे... आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार, अशी विजयी प्रतिक्रिया दिली. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.