हैदराबाद : चंद्राबाबू नायडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजतंय. चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगू देसम पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एनडीएमध्ये राहण्याबाबतचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने नायडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसंच एनडीएमधून बाहेर पडण्याचा इशारा नायडू यांनी दिला होता. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी तरतूद केली नसल्याने नायडूंच्या नाराजीत आणखी भर पडली.
याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजतंय. त्यामुळे आता विजयवाडा इथं होणा-या पक्षाच्या बैठकीत नायडू एनडीएमध्ये राहण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय.