बंगळुरु : भारतासाठी आणि इस्त्रोसाठी एक चांगली बातमी आहे. चांद्रयान - २ ने पृथ्वीची कक्षा सोडली आहे. आता चांद्रयान -२ चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. २० ऑगस्टच्या सुमारास चांद्रयान -२ चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचेल.
चांद्रयान - २ ची पृथ्वीच्या कक्षेतील शेवटची आणि अत्यंत महत्वाची हालचाल पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी यानाला सज्ज करण्यात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. पहाटे दोन वाजून एकवीस मिनिटांनी ही यशस्वी हालचाल घडवून आणण्यात आली. यावेळी यानासोबत असणाऱ्या द्रवरुप इंधनासवर चालणारे इंजिन सुरू करण्यात आला.
#ISRO
Today (August 14, 2019) after the Trans Lunar Insertion (TLI) maneuver operation, #Chandrayaan2 will depart from Earth's orbit and move towards the Moon. pic.twitter.com/k2zjvOBUE6— ISRO (@isro) August 13, 2019
जवळपास१२०३ सेकंद हे इंजिन सुरू होते. यामुळे चांद्रयान - २ ला चंद्राच्या कक्षेत धाडण्यासाठी आवश्यक अशा ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात आले आहे. पृथ्वीवरून भूस्थीर कक्षेत पाठवल्यापासून चांद्रयान - २ ची ही कक्षा बदलण्याची पाचवी वेळ होती.
#ISRO
Trans Lunar Insertion (TLI) maneuver was performed today (August 14, 2019) at 0221 hrs IST as planned.For details please see https://t.co/3TUN7onz6z
Here's the view of Control Centre at ISTRAC, Bengaluru pic.twitter.com/dp5oNZiLoL
— ISRO (@isro) August 13, 2019