तब्बल 5 महिन्यांनंतर Chandrayaan-3 चा एक महत्त्वाचा भाग जगाच्या 'या' कोपऱ्यात कोसळला आणि...

ISRO कडून चांद्रयान 3 (Chandrayaan-3 ) मोहिमेसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या माहितीला दुजोरा. असं नेमकं काय घडलं की इस्रोनंच केली काही गोष्टींची खात्री पटवून दिली...   

सायली पाटील | Updated: Nov 16, 2023, 02:48 PM IST
तब्बल 5 महिन्यांनंतर Chandrayaan-3 चा एक महत्त्वाचा भाग जगाच्या 'या' कोपऱ्यात कोसळला आणि...  title=
Chandrayaan 3 cryogenic upper stage uncontrolled entered in earth atmosphere

Chandrayaan 3  latest update : ISRO ची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिम म्हणून Chandrayaan 3 कडे पाहिलं गेलं. असंख्य भारतीयांसह संशोधकांच्याही अपेक्षा या मोहिमेनं पूर्ण करत चंद्रावर यशस्वीरित्या Soft Landing केली. याच चांद्रयानाच्या लँडर आणि रोवरनं चंद्रावरील धरणीची विविध रुपं आणि तेथील माहितीसुद्धा पृथ्वीपर्यंत पोहोचवली. याच चांद्रयानासंदर्भातील एक मोठी आणि भुवया उंचावणारी माहिती इस्रोनं देत त्या माहितीला दुजोराही दिला. 

ISRO नं स्पष्ट केल्यानुसार Chandrayaan-3 ला पृथ्वीपासून दूर  133 km X 35,823 km च्या कक्षेत पोहोचवणारं क्रायोजेनिक अपर स्टेज (Cryogenic Upper Stage) आता पृथ्वीवर परतलं असून, ते जगाच्या एका कोपऱ्यावर पोहोचलं आहे. हे रॉकेट पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला अमेरिकेपाशी कोसळल्याची माहिती आहे. हा चांद्रयाननाचा तोच भाग होता ज्यामुळं ते 14 जुलै 2023 रोजी वरील कक्षेमध्ये पोहोचलं होतं. इथूनच या मोहिमेला कलाटणी मिळाली होती. पण, क्रायोजेनिक अपर स्टेज (Cryogenic Upper Stage) मात्र तेव्हापासून पृथ्वीभोवतीच घिरट्या घालत हळुहळू पृथ्वीच्या पृष्ठानजीक येत होतं. 

अमेरिकेनजीकच्या किनारपट्टी भागात नेमकं काय घडलं? 

15 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरानं, साधारण 2 वाजून 45 मिनिटांनी चांद्रयान 3 चा हा भाग अमेरिकेच्या किनाऱ्यापासून दूर पॅसिफिक महासागरात कोसळला. नॉर्थ अमेरिकन एयरोस्पेस डिफेंस कमांड (NORAD) या भागावर लक्ष ठेवून होतं. याच संस्थेकडून इस्रोशी संपर्क साधत त्यानंतर ही वस्तू नेमकी आहे तरी काय याबाबतच्या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. इस्रोनंही हा भाग चांद्रयानाचाच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

या भागाचं इतक महत्त्वं का? 

क्रायोजेनिक अपर स्टेज हा चांद्रयान 3 चा एक महत्त्वाचा भाग. या भागाचा व्यास 13 फूट आणि लांबी 44 फूट इतकी आहे. त्यामध्ये 28 मेट्रिक टन इतकं इंधन सहज भरता येतं. संशोधक या भागाचा उल्लेख C25 म्हणून करतात. चांद्रयानाच्या प्रक्षेपणातही या भागानं अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. पर्यावरण पूरक करण्यासाठी या भागाला वजनानं हलकं ठेवण्यात आलं होतं.

इंटर-एजेसी स्पेस डेबरी कॉर्डिनेशन कमेटी (IADC)ला दिलेल्या माहितीमध्ये इस्रोनं काही गोष्टी अधिक स्पष्ट करत सांगितल्या होत्या. ज्यामध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून कोणतीही गोष्ट भूभागावर पोहोचण्यासाठी 124 दिवसांचा कालावधी लागतो.  LVM-3 M4 रॉकेटचा हा भागसुद्धा साधारण इतक्याच दिवसांनंतर पृथ्वीर परतला. किंबहुना पृथ्वीवर परतत असताना त्याचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी अंतराळातच त्याचं पॅसिवेशन करण्यात आलं होतं. सोप्या शब्दांत सांगावं तर, त्यातील इंधन काढून घेण्यात आलं होतं.

हेसुद्धा वाचा : सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार

संयुक्त राष्ट्र आणि IADC च्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. या नियमानुसार अवकाशात रॉकेटचा एखादा भाग फिरत असेल, तर रॉकेट लाँच झाल्यानंतर काही कालावधी सरताच त्यातील इंधन काढलं जातं. जेणेकरून तो भाग पृथ्वीवर परततेवेळी कोणताही अपघात होणार नाही.