50 रुपयांपेक्षाही स्वस्त शेअर! येत्या काळात देऊ शकतो दमदार रिटर्न्स, वाचा सविस्तर

 शेअर बाजारात कमाई करण्यासाठी चांगल्या शेअरच्या तुम्ही शोधात असाल तर लहान शेअर्स तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात

Updated: Jul 22, 2021, 12:19 PM IST
50 रुपयांपेक्षाही स्वस्त शेअर! येत्या काळात देऊ शकतो दमदार रिटर्न्स, वाचा सविस्तर  title=

मुंबई : शेअर बाजारात कमाई करण्यासाठी चांगल्या शेअरच्या तुम्ही शोधात असाल तर लहान शेअर्स तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात. असाच एक शेअर आहे कॅप्टन पॉलीप्लास्ट (CPL)... शेअरची किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात या शेअरमध्ये 15 रुपयांपर्यंत तेजी दिसू शकते. या शेअरची सध्या किंमत 35 रुपयांच्या आसपास आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असलेल्या CPL या शेअरच्या प्रोडक्ट्सची डिमांड वाढली आहे. वार्षिक महसूल 64.3 कोटी होता. तसेच कंपनी च्या EBITDAमध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षीदेखील कंपनीचा नपा 2.6 कोटी रुपये आहे.

CPL च्या आपल्या कोअर बिझनेससोबतच कॉम्प्लीमेंट्री प्रोडक्ट्समध्येही मोठ्या नफ्यात आहे. कंपनीचा कोअर बिझनेस मायक्रो इरिगेशन प्रोडक्ट्सचा आहे. यातून कंपनीचा 95 टक्के महसूल असतो. कंपनीच्या इतर उत्पादनांमध्ये सोलर इक्विपमेंट्स, वॉटर सोल्युबल फर्टिलायजर सारखे प्रोडक्ट आहेत.

मायक्रो इरिगेशन बिझनेसला येत्या काळात चांगला स्कोप आहे. तसेच सरकारी धोरणांच्या आधारे पुढील 5 वर्षात हा बिझनेस गती पकडू शकतो. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत या सेक्टरला संकटातून बाहेर निघण्यासाठी मदत दिली आहे. या योजनेत पुढील पाच वर्षात 50 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा प्रस्ताव आहे.