डॉनच्या बर्थ-डे पार्टीत मोठे गुन्हेगार टुल्ल, तेव्हाच पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री

चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महागात पडलं आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 8, 2018, 08:00 PM IST
डॉनच्या बर्थ-डे पार्टीत मोठे गुन्हेगार टुल्ल, तेव्हाच पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री   title=

चेन्नई : चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महगात पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांनी एकाच ठिकाहून तब्बल ६७ वॉन्टेड गुन्हेगारांना अटक केलीये. ही अनपेक्षित घटना यामुळे घडली, कारण सर्व गॅंगस्टर आपल्या कथित ‘बॉस’चा बर्थ-डे साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. 

फार्म हाऊसवर रंगली होती डॉनची पार्टी

मीडिया रिपोर्टनुसार, सर्वच गॅंगस्टर्स चेन्नईच्या बाहेरच्या परीसरातील मलिय्यमबक्कम गावातील एका फार्म हाऊसमधून पकडले आहेत. या गावातील फार्म हाऊसमध्ये डॉन चुलईमेडू बिन्नूच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. असे सांगितले जात आहे की, गॅंगस्टर्सच्या या बर्थ-डे पार्टीची माहिती पोलिसांना मंगळवारी गाड्यांच्या चेकींगदरम्यान मिळाली होती. 

चेकींगमध्ये मिळाली पोलिसांना टीप

पोलीस टोलनाक्यावर गाड्यांची झडती घेत होती. तेव्हाच एका कारमध्ये अनेक गॅंगस्टर्स बसून जात असल्याचे दिसले. नंतर पोलिसांना चौकशीतून माहिती मिळाली की, सर्वच डॉन चुलईमेडू बिन्नूच्या बर्थ-डे पार्टीसाठी जात होते. ही माहिती मिळताच सर्वच चौक्या आणि पोलीस स्टेशनांना अलर्ट पाठवण्यात आला. नंतर पोलिसांकडून ‘ऑपरेशन बर्ड-डे’ करण्यात आलं. 

केक कापताना पोलिसांची ‘दबंग’ एन्ट्री

पोलिसांनी जेव्हा फार्म हाऊसवर छापा मारला तेव्हा डॉन चुलईमेडू बिन्नू केक कापत होता. पोलिसांच्या धाडीची माहिती मिळताच तिथे एकच गोंधळ उडाला आणि ६७ गॅगस्टर्सना पोलिसांनी अटक केली. पण डॉन चुलईमेडू बिन्नू चे काही साथीदार तेथून दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी केक कापताना बिन्नूने हातात शस्त्रास्त्र घेऊन फोटोही काढले होते. 

बर्थ-डे पार्टीत गुन्हेगारांना आमंत्रण

डॉनच्या फार्म हाऊसमधून पोलिसांच्या धाडीदरम्यान ६० दुचाकी गाड्या, ६ लक्झरी कार्स आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले. असे सांगितले जात आहे की, ६ फेब्रुवारीला डॉन बिन्नूचा ४७वा बर्थ-डे होता आणि त्याने त्या दिवशी एक मोठी पार्टी ठेवली होती. यात चेन्नईतील गुन्हेगारांनाच बोलवण्यात आले होते. 

अन गुंडांना पत्ताही लागला नाही...

चेन्नई पोलिसातील एका अधिका-याने सांगितले की, ‘काही गुंडांना कळलंच नाही की, तिथे काय झालं. एकाने हेही समजावण्याचा प्रयत्न करीत होता की, ही एका वाढदिवसाची पार्टी होती. त्याला वाटत होतं की, आम्ही तिथे ती पार्टी रोखण्यासाठी गेलोय’.