नवी दिल्ली : १९९६ च्या क्रिकेट वर्ल्डकपमधून धमाकेदार सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला कोणीही विसरू शकत नाही.
त्याच्या घातक बॅटींगची दहशत जगभरातील बॉलर्सच्या मनात असायची. पण तो बिना कुबड्यांच्यासहारे चालु शकत नाही ही सद्यस्थिती आहे.
श्रीलंकेचे वृत्तपत्र 'सीलॉन टूडे' च्या वृत्तानुसार जयसुर्या गुडघ्याच्या आजाराने त्रस्त आहे, ज्यामध्ये उभे राहणेही मुश्कील आहे.
पण आता त्याच्यावर इलाज होण्याच आशावाद निर्माण झाला आहे. कारण भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर त्याचा इलाज करणार आहेत.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आयुर्वेदाचार्य डॉ.प्रकाश हे जयसुर्याचा इलाज करणार आहेत.
१० फेब्रुवारीपासून ते सनथवर उपचार सुरू करणार आहेत. पाताळकोटच्या जडीबुटींपासून त्याच्यावर इलाज होणार आहे.. यासाठी आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रकाश श्रीलंकेसाठी रवाना झाले आहेत.
श्रीलंका टीमचा माजी कप्तान सनथ जयसूर्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत तो कुबड्यांच्या सहाऱ्यावर दिसतोय.
श्रीलंकेचा तुफानी फलंदाज आज स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडतोय.
श्रीलंकेतील वार्तापत्र 'सीलोन टुडे' ने दिलेल्या वृत्तानुसार, बिना कुबड्यांच्या सहारे तो एका पाऊलही पुढे टाकू शकत नाहीए.
जयसूर्याच्या तुफानी बॅटींगसमोर बॉलिंग करायला जगभरातील मोठमोठे बॉलर्सही विचार करायचे.
त्याने ४० च्या सरासरीने ११० टेस्ट मॅचमध्ये ६९७३ रन्स बनविले. तर ५० ओव्हर फॉर्मेटमध्ये ४३३ मॅचमध्ये १३,००० रन्स केले.