चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न पेटला, चेन्नईतील सामने आता पुण्यात

चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने दुसरीकडे होणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2018, 08:59 AM IST
चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न पेटला, चेन्नईतील सामने आता पुण्यात  title=

मुंबई : चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.  त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने आता पुण्यात खेळवण्यात येतील. दरम्यान, कावेरी पाणी प्रश्नावरुन मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामनाही उशिरा सुरु झाला होता. त्याचप्रमाणे रवींद्र जाडेजा आणि फाफ ड्यू प्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. त्यामुळेच आता चेन्नईचे सामाने इतरत्र ठिकाणी हलवण्यात आलेत. दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नईला घरच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळतो. मात्र, आता चेन्नईच्या पाठिराख्यांना आपल्या टीमसाठी चीअर करण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागणार आहे.

तामिळनाडूत आंदोलनात हिंसा

तामिळनाडूत सध्या कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात हिंसा होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला.  

याआधी आफ्रिकेत प्रश्न उद्धभवला

तसेच याधी भारत क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला क्रिकेटपटूंना देण्यात आला होता.दक्षिण आफ्रिका खंडातील  केपटाऊन शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आता चेन्नई शहरात पाणी समस्या निर्माण झालेय. कावेरी पाणीप्रश्न निर्माण झाल्याने चेन्नईतील क्रिकेट सामने दुसऱ्या शहरात घेण्याची मागणी झाली होती.

 केदार जखमी, इंग्लंडचा खेळाडू इन

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा केदार जाधव दुखापतग्रस्त झाला. मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे केदार जाधव संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. त्यामुळे केदार जाधवऐवजी इंग्लंडचा ऑल राऊंडर डेव्हिड विलीला चेन्नईच्या टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.