पेपर घेऊन घरी जा आणि लिहा...छत्तीसगड पॅटर्नची देशात चर्चा

विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय 

Updated: May 24, 2021, 12:23 PM IST
पेपर घेऊन घरी जा आणि लिहा...छत्तीसगड पॅटर्नची देशात चर्चा title=

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय. कोरोनाने पुन्हा एकदा सगळं स्तब्ध केलं आहे. अशा परिस्थिती दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायचा? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. अशावेळी छत्तीसगडच्या एक रामबाण उपाय शोधून काढला आहे. 

छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात एक जूनपासून होणार आहे. विद्यार्थ्यांना घरी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. मंडळाकडून विद्यार्थ्यांना पेपर आणि उत्तर पत्रिका घरी घेऊन जाण्यास परवनागी दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 5 दिवसांत उत्तर पत्रिका पूर्ण करून द्यायचे आहेत. याबाबत मंडळाने माहिती दिली आहे. 

माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका घेऊन जाण्यासाठी बोर्डाने निर्धारित सेंटरवर जाण्यास सांगितले आहे. यानंतर त्यांनी घरी राहून प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. सेंटरबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहिती देण्यात येणार आहे. 1 ते 5 जून विद्यार्थी सेंटरवरून पेपर घेऊन जाऊ शकतात. 

कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे. दहावीची परीक्षा घेण्याबात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. परीक्षा न घेण्यावर न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. असे असूनही सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या महाअधिवक्तांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर दहावी परीक्षेबाबत (10th board exam) राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.