Kolkata Crime News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख असतं. मात्र, अनेकजण संकटाला खंबीरपणे सामोरे जातात. मात्र, काहींना त्रास सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. अशातच आता कोलकातामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाताच्या एका पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या इराद्याने पुलावर चढलेल्या एका व्यक्तीला नोकरीचं आमिष आणि बिर्याणीचं खाऊ घालण्याचं (Chicken biryani Save Man) आश्वासन देत पोलिसांनी खाली उतरवलं. सोमवारी दुपारी ही घटना घडली. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील मुख्य रस्त्यावरील हा हायव्होल्टेज ड्रामा संपवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. पाहूया नेमकं काय झालं?
आरोपी सोमवारी दुपारी त्याच्या मुलीला बाईकवरून सायन्स सिटीला घेऊन जात होता. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास तो अचानक एका पुलाजवळ थांबला. मुलीचा मोबाईल कुठंतरी पडलाय, असं त्याने सांगितलं आणि मुलीला एका बाजूला उभं केलं अन् थेट पुलावर चढला. रस्त्याने जाणाऱ्यांना पाहून तो खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी थेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखलं झालं.
पोलिस येईपर्यंत लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन गट आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण केलं. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी सर्व व्यवस्था केली. पोलिसांच्या लाख समजवण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांना घामाच्या धारा फुटल्या. अखेर मुलीच्या माध्यमातून त्याला उतरवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याला जॉबची ऑफर दिली. त्याचबरोबर पैसे देऊ असं आश्वासन देखील दिलं. मात्र, त्यानं ऐकलं नाही. अखेर पोलिसांनी बोलता बोलता त्याला बिर्याणी खाऊ घालण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्याने नाही हो करत खाली उतरवण्यात यश आलं. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील मुख्य रस्त्यावर हा हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यामुळे तासनतास जाम होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला खाली उतरवल्यानंतर त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत त्यांच्या मुलीला नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलंय.
पोलिसांनी काय म्हटलंय?
पुलावर चढून आत्महत्या केलेली व्यक्ती कराया पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. पत्नीपासून वेगळे राहिल्याने आणि व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीमुळे तो प्रचंड तणावाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.