चिराग पासवान यांची अग्निपरीक्षा, गमवण्यासाठी काही नाही पण जिंकले तर...

चिराग पासवान यांनी जनतेला दिला तिसरा पर्याय...

Updated: Oct 15, 2020, 12:07 PM IST
चिराग पासवान यांची अग्निपरीक्षा, गमवण्यासाठी काही नाही पण जिंकले तर... title=

पटना : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत काही प्रभाव पडू शकतो. बिहारच्या राजकारणात सध्या एलजेपीचा प्रवास हा तिसरा पर्याय म्हणून पुढे जात आहे. रामविलास पासवान यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने काम केले त्याचा पक्षाला फायदा होईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पक्षाला पुढे नेईल, असा पक्षाचा विश्वास आहे. त्याच वेळी, राजकीय विश्लेषकांच्या मते, रामविलास पासवान यांच्या निधनाचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे एनडीएला फायदा होईल.

खरं तर निवडणुकीच्या हंगामात राजकीय पक्षांनी जोरदार कसरत सुरू केली होती. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय शोककळा पसरली. पक्षाचे सरचिटणीस शाहनवाज अहमद कैफी यांनी म्हणलं की, सध्या एलजेपी कुटुंब शोकात आहे. परंतु रामविलास पासवान यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र घेण्याच्या त्यांच्या विचारसरणीमुळे, केवळ पक्षालाच सहानभूतीचा फायदा होणार नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे एलजेपी या निवडणुकीत अधिक चांगले काम करेल.

सध्याच्या विधानसभा निवडणुकीत, महागठबंधन आणि एनडीए या दोघांचे सामाजिक समीकरण बदलले आहे आणि यादरम्यानच एलजेपीने नवीन पर्याय लोकांसमोर ठेवला आहे. ते भाजपसोबत आहे पण जेडीयूच्या विरोधात आहे. त्यामुळे बंडखोरीच्या नवीन समीकरणाचा मार्ग उघडत आहे. अशा परिस्थितीत एलजीपीने एनडीए न सोडता आपली बाजू वेगळी ठेवून जेडीयूला लक्ष्य केले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. जेडीयूवर चिडलेल्या अशा अँटी इनकंबेंसी मतदारांचा फायदा एलजेपीला होईल आणि हे मत आरजेडीच्या खात्यात न जाता आता एलजेपीच्या खात्यात जाईल.

या निवडणुकीत एलजेपीला गमवण्यारारखं काहीच नाही. सध्या विधानसभेत पक्षाचे दोनच आमदार आहेत. अशा परिस्थितीत जर पक्षाने आधीच्या स्वरूपात एनडीएबरोबर निवडणूक लढविली असती तर संख्याबळानुसार जास्त जागा जिंकण्याची शक्यता नव्हती. पण आता एकला चलो रे च्या भूमिकेमुळे पक्षाला अधिक कार्यकर्ते आणि उमेदवारांना तिकिटे देण्याची संधी मिळते आहे. त्याच वेळी, एलजेपीला स्वत: चे मूल्यांकन करण्याची संधी देखील मिळेल. त्याचबरोबर अधिक जागा लढवून विजयाची टक्केवारी वाढवता येईल. नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षाच्या जागा कमी करत जर एलजेपीने जागा निवडून आणल्या तर बिहारमध्ये एक नवीन परिवर्तन येईल. पक्ष तसं काही गमवणार नाही पण मिळालं तर खूप काही मिळेल. ज्यामुळे चिराग पासवान यांची भविष्यातील वाटचाल ठरेल. त्यामुळे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच असणार आहे.