नवी दिल्ली : तुम्ही दररोज ट्रेनने प्रवास करता तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड'ने(आयआरसीटीसी) एसबीआय कार्डच्या माध्यमातून फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.
फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर केवळ IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्ड (IRCTC SBI Platinum Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. याची माहिती आयआरसीटीसीतर्फे आपल्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
Choose #IRCTC SBI Platinum Credit Card and save bank transaction charges on train tickets booked at IRCTC.
Log on to https://t.co/s3mX8V8YUd pic.twitter.com/wjTxK9jjan
— IRCTC (@IRCTCofficial) May 14, 2018
आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्डमध्ये ३५० रिवॉर्ड पॉईंट्स, १.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज वेवर, २.५ टक्के फ्युअल सरचार्ज वेवर आणि रेल्वे तिकीटावर १० टक्के व्हॅल्यू बॅक ऑफर देण्यात येत आहे.
फ्री मध्ये रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी सर्वातआधी आयआरसीटीसी एसबीआय प्लटिनम क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या सुविधेसोबतच एसबीआयच्या या कार्डवर इतरही फायदे मिळत आहेत. पाहूयात कशा प्रकारे मिळणार फ्री रेल्वे तिकीट...
जर तुम्ही IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्डच्या माध्यमातून www.irctc.co.in वरुन तिकीट काढाल. तर तुम्हाला १.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज देण्यापासून सूट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला तिकीट बुकींग करताना ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावं लागणार आहे. मात्र, त्यानंतर ही रक्कम वेव ऑफ होऊन तुमच्या क्रेडिट कार्डच्या खात्यात जमा होणार आहे.
IRCTC SBI Platinum Card वरुन शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर खर्च केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. कार्डच्या माध्यमातून १२ रुपये खर्च केल्यास ग्राहकांना एक रिवॉर्ड पॉईंट मिळतो. अशा प्रकारे मिळवलेले रिवॉर्ड पॉईंट्स एकत्र करुन तुम्ही irctc.co.in वरुन तिकीट बूक करुन ते मिळवू करु शकता. ज्यावेळी तुमच्या तिकीटाची रक्कम आणि रिवॉर्ड पॉईंट्सची वॅल्यू बरोबर होईल त्यावेळी तुम्ही रिडीम करु शकता.
IRCTC SBI Platinum Card वरुन पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास २.५ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज पासून तुम्हाला सूटका मिळणार आहे. ही सुविधात सर्व पेट्रोल पंपांवर ५०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही कार्डच्या माध्यमातून ५०० रुपयांचं पेट्रोल खरेदी केलं तर तुम्हाला २.५ टक्के म्हणेजच १२.५ रुपये ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावा लागणार. मात्र, या कार्डच्या माध्यमातून तुमची ट्रान्झॅक्शन चार्जपासून सूटका होणार आहे.