ही बँक आपला व्यवसाय बंद करत आहे, यात आपले अकाऊंट आहे का?

Citibank India Exit : जगातील आघाडीच्या बँकिंग कंपन्यांपैकी एक असलेली सिटी बँक आता आपला व्यवसाय भारतात गुंडाळणार आहे. 

Updated: Apr 16, 2021, 02:43 PM IST
ही बँक आपला व्यवसाय  बंद करत आहे, यात आपले अकाऊंट आहे का? title=

मुंबई : Citibank India Exit : जगातील आघाडीच्या बँकिंग कंपन्यांपैकी एक असलेली सिटी बँक आता आपला व्यवसाय भारतात गुंडाळणार आहे. त्यासाठी तयारी करीत आहे. अमेरिकन बँक Citi bankने गुरुवारी भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली. तथापि, बँकेने हा निर्णय घेतल्याने खातेदार आणि कर्मचार्‍यांवर मोठा परिणाम होणार आहे.

श्रीमंत देशांवर लक्ष केंद्रीत 

सिटी बँकेच्या किरकोळ व्यवसायात क्रेडिट कार्ड, बचत बँक खाती आणि वैयक्तिक कर्ज यासारख्या विभागांचा समावेश आहे. भारतात रिटेल बँकिंगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सिटीबँक सांगण्यात की, ते त्याच्या जागतिक रणनीतीचा एक भाग आहे. सिटी बँकने जागतिक पातळीवर निर्णय घेतला आहे की ते 13 बाजारातून आपल्या या व्यवसाय बाहेर पडणार आहे. सिटीबँक आता केवळ काही श्रीमंत देशांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

बँकिंग व्यवसायातील सुमारे 4,000 कर्मचारी

बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटी बँकच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. सिटी बँकेचे ग्लोबल सीईओ जेन फ्रेझर म्हणाले की, या भागांमध्ये स्पर्धा नसल्यामुळे बँकेने तसे करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी बँकच्या किरकोळ व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी नियामक मान्यता आवश्यक असतील.

'आमच्या कामांमध्ये कोणताही बदल नाही'

सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले की, आमच्या कामांमध्ये त्वरित बदल झालेला नाही आणि या घोषणेचा आमच्या सहकाऱ्यांवर तातडीने परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. ते म्हणाले की या घोषणेमुळे बँकेच्या सेवा आणखी मजबूत करण्यात येतील. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करेल.  1902 मध्ये सिटी बँकने भारतात प्रवेश केला आणि  1985मध्ये बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरु केला.

व्यावसायिक पार्टनच्या शोधात  

सिटी बँक आपल्या नवीन व्यवसाय धोरणांतर्गत भारता व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, बाहारिन, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाममधील किरकोळ बँकिंग व्यवसायातून बाहेर पडेल. पण त्याचा घाऊक व्यवसाय सुरुच राहील. मीडिया रिपोर्टनुसार, सिटी बँक आपला किरकोळ आणि ग्राहकांचा व्यवसाय भारतात विकण्यासाठी खरेदीदारांचा शोध घेत आहे.