नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश महत्त्वाची प्रकरणं ज्येष्ठता टाळून कनिष्ठ न्यायाधीशांकडे वर्ग करतात, असा आरोप चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या सुनावणीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. लोया मृत्यूप्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी एक याचिका काँग्रेस नेते तहसीन पूनावाला आणि दूसरी याचिका बंधुराज लोणे यांनी दाखल केली आहे.
दरम्यान, लोया यांच्या मृत्युप्रकरणाचा गोपनीय अहवाल गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाकडे सुपुर्द करण्यात आला होता. हा अहवाल जाहीर करू नये अशी विनंती कोर्टाला करण्यात आली होती. राज्य सरकारकडून याप्रकरणी हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.