ढगफुटीमुळे काहींनी गमावला जीव, तर काहींनी आपल्या माणसांना गमावलं

देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. कुठे पूराने लोकांना आपलं घरदार गमवावं लागलंय, तर काहींना पावसाच्या हाहाकारामुळे जवळच्या लोकांना शेवटचं ही बघता आलेलं नाही.

Updated: Jul 30, 2021, 07:07 PM IST
ढगफुटीमुळे काहींनी गमावला जीव, तर काहींनी आपल्या माणसांना गमावलं

श्रीनगर : देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. कुठे पूराने लोकांना आपलं घरदार गमवावं लागलंय, तर काहींना पावसाच्या हाहाकारामुळे जवळच्या लोकांना शेवटचं ही बघता आलेलं नाही.

जम्मू -काश्मीरच्या किश्तवाडमध्ये अलीकडच्या वर्षातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आली. येथील गुलाबगढ परिसरात ढगफुटीमुळे किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक बेपत्ता आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बेपत्ता झालेल्याची संख्या 35 वर येऊन पोहोचली आहे, तर 17 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

एनडीआरएफ तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. ढगफुटीला इंग्रजीमध्ये क्लाउड बर्स्ट असं म्हणतात, ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते. या घटनेत काही तासांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो. हे ढग का फुटतात हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का?

ढगफुटीत कमी वेळात होतो भरपूर पाऊस 

ढगफुटी झाल्यास खूप कमी वेळात भरपूर पाऊस पडतो. या दरम्यान, कधीकधी गाराही पडतात आणि वादळ देखील येण्याची शक्यता असते. सहसा, ढगफुटीमुळे, काही मिनिटांत इतका वेगाने पाऊस पडतो की काही किलोमीटरमध्ये, काही मिनिटांत पूर परिस्थिती निर्माण होते. या दरम्यान, इतका पाऊस पडण्याचं प्रमाण खूप जास्त असते.

असे मानले जाते की ढग फुटण्याची घटना सहसा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 15 किमी उंचीवर होते. जर पावसाळ्यात सुमारे 100 मिमी प्रति तास या वेगाने पाऊस पडला तर त्या स्थितीला ढग फुटणे असे म्हणतात.

शास्त्रज्ञांचा ढगफुटीवर विश्वास नाही

अवघ्या काही मिनिटांत 2 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात विनाश दिसून येतो. दरम्यान ढगफुटी सारख्या घटनेवर वैज्ञानिकांचा विश्वास नाही.ढग फुग्यासारखा फुटण्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. असं काहीही घडत नसल्याचं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

 ज्या वेळेस काही मिनिटांत खूप मुसळधार पाऊस पडतो, लोक त्याला ढग फुटण्याची घटना म्हणतात. हवामानशास्त्रानुसार, जेव्हा ढगांमध्ये भरपूर आर्द्रता असते. जेव्हा त्यांच्या स्थितीत अडथळा येतो, तेव्हा संघनन खूप वेगवान होते. या परिस्थितीत, प्रभावित आणि मर्यादित क्षेत्रात एकाच वेळी अनेक लाख लीटर पाणी पृथ्वीवर येते. यामुळे त्या भागात पूर परिस्थिती निर्माणआहे.