VIDEO: मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची सूचना

Madhya Pradesh News:डॉक्टरांची भाषा असो किंवा त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन असो त्यावरील अक्षर अनेकांना गोंधळात घालतात. अगदी मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेल्यावर तिथल्या व्यक्तीला औषधांची नावं वाचता येतं नाही. अशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक अजब सल्ला दिला आहे. 

Updated: Oct 16, 2022, 02:16 PM IST
VIDEO: मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची सूचना title=
cm shivraj singh chouhan advice doctors can write shri hari on prescriptions nmp

Shivraj Singh Chouhan: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात 'हॅलो नव्हे – वंदे मातरम्' (Vande Mataram On Calls) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी पाट्यांचा विषय लावू धरला होता. आता यात अजून एक नाव जोडायला हवं, एका नेत्याचा अजब सल्ला सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

अजब सल्ला 

डॉक्टरांची भाषा असो किंवा त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन असो त्यावरील अक्षर अनेकांना गोंधळात घालतात. अगदी मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेल्यावर तिथल्या व्यक्तीला औषधांची नावं वाचता येतं नाही. अशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांनी एक अजब सल्ला दिला आहे. (cm shivraj singh chouhan advice doctors can write shri hari on prescriptions nmp)

प्रिस्क्रिप्शनवर 'श्री हरी'लिहा! (shri hari on prescriptions)

शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमधील डॉक्टरांना विनोदी स्वरात हिंदीत औषधे लिहिण्याचा आणि प्रिस्क्रिप्शनवर 'श्री हरी' लिहिण्याचा सल्ला दिला आहे. सीएम शिवराज म्हणाले की, आज प्रत्येक गावात डॉक्टरांची (doctors) गरज आहे. परंतु बरेच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण सोडून देतात कारण त्यांना इंग्रजी येत नाही. मी विचारतो की, पेशंटला हिंदीत औषध लिहायला काय हरकत आहे. क्रोसिन (औषध) लिहायचं असेल तर हिंदीत लिहिता येत नाही का, काय अडचण येते. पत्रकाच्या वरच्या बाजूला Rx च्या जागी 'श्री हरी' लिहा आणि औषधाचं नाव हिंदीत लिहा.

व्हिडीओ पाहा

वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू करण्याच्या मध्य प्रदेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शुभारंभ करणार आहेत. याच्या एक दिवस आधी शनिवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे वक्तव्य केलं आहे. . हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षण देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरेल असा चौहान यांचा विश्वास आहे.