आजही छोटंसं दुकान चालवतात CM योगींचे भावजी; बहिणीचंही सर्वसामान्य आयुष्य

मुख्यमंत्री योगी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले असूनही त्यांचे कुटूंब आजही सामान्य नागरीकांसारखे जीवन जगत आहेत

Updated: Apr 7, 2022, 09:09 AM IST
आजही छोटंसं दुकान चालवतात CM योगींचे भावजी; बहिणीचंही सर्वसामान्य आयुष्य title=

लखनऊ : पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली असून योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. योगी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले असूनही त्यांचे कुटूंब आजही सामान्य नागरीकांसारखे जीवन जगत आहेत. त्यांची उत्तराखंड येथील बहिण शशी आणि पती पूरण सिंग पायल हे देखील कोणत्याही व्हीआयपी कल्चरपासून लांब आजही सर्वसामान्य जीवन जगत आहेत. शशी आणि पूरण सिंग पायल यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. त्यावर त्यांचे उत्पन्न अवलंबून आहे.

'योगींच्या 5 वर्षांच्या कार्याने जनता प्रभावित'

पूरण सिंग यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशच्या जनतेने योगीजींना   पुन्हा निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मुख्यमंत्री योगी यांच्या मागील 5 वर्षांच्या कार्याने राज्यातील जनता खूप प्रभावित झाली आहे.

मुख्यमंत्री योगींच्या बहिणींचा पूरण यांच्याशी विवाह

पूरण म्हणाले की, आम्हाला यूपीतील नातेवाईक नेहमी सांगायचे की, आम्ही पुन्हा योगींनाच निवडून आणू. पूरण सिंह पुढे म्हणतात की, 1991 मध्ये आमच्या लग्नाच्या वेळी योगींनी आमच्या विधीनुसार बहिणीची डोली स्वतः आणली होती.

'कौटुंबिक जीवनात विशेष लक्ष नव्हते'

पूरण सिंह यांनी सांगितले की, त्यावेळी योगी ऋषिकेशमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होते. सुट्टी असली की ते आम्हाला भेटायला येत असत. योगींचे ध्यान कौटुंबिक जीवनात कधीच नव्हते. त्यांचे शिक्षण आणि लिखाणावर जास्त लक्ष असायचे आणि मला मानवी जीवनासाठी काहीतरी करायचे आहे असे म्हणायचे. 

पूरण सिंह म्हणाले की, सीएम योगी यांच्याशी आमची फारशी खास चर्चा होत नाही, पण जेव्हा होते तेव्हा ते काळजीने सर्व गोष्टींची विचारपूस करतात.