खुशखबर! 'या' महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता

जवळपास गेल्या दशकभरामध्ये ....

Updated: Aug 17, 2020, 01:05 PM IST
खुशखबर! 'या' महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरत आहे. कारण, येत्या काळात घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसर्गिक वायू (Natural Gas)च्या दरांमध्ये मोठ्या फरकानं कपात होणार आहे. दर सहा मिहन्यांनी गॅसचे दर निश्चित करण्यात येतात. 

प्रथमत: एप्रिल आणि दुसऱं म्हणजे ऑक्टोबर अशा महिन्यांमध्ये हे दर निश्चित करण्यात येतात. सध्या एप्रिल महिन्यांचे दर निश्चित झाले आहेत. आता ऑक्टोबरमध्ये जाहीर केले जाणारे दर 1.90-1.94 डॉलर प्रति एमएमबीटीयू (MMBTU) इतके असू शकतात. जवळपास गेल्या दशकभरामध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घट असेल. 

 

गॅस निर्यात करणाऱ्या राष्ट्रांकडून बेंचमार्क दरांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२० पासून नैसर्गिक वायूच्या किमती निर्धरित करण्यात येणार आहेत. परिणामी गॅसचे दर कमी होऊन 1.90 वरुन 1.94 प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट (MMBTU) इतके होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास एका वर्षात नैसर्गिक वायूच्या दरात कपात होण्याची ही तिसरी वेळ असेल.