नवी दिल्ली : सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात काहीशी gold price today घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा भाव 52,223 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 382 रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव 67,553 रुपये इतका आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिनबाबत जशी माहिती येत राहील, त्यानुसार सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढेल. सद्यस्थितीत सोन्याच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची घसरण होऊ शकते. त्यामुळे सोनं स्वस्त होऊ शकतं. ज्या वेगाने सोन्याचे दर वाढले आहत, त्या वेगाने दर कोसळूही शकत असल्याचा अंदाज आहे.
कोरोना संकटात गुंतवणूकदारांचा कल सोनं गुंतवणूकीकडे वाढत आहे. जुलै महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Gold ETF)गुंतवणूक गेल्या महिन्याच्या तुलनेत 86 टक्के वाढली असल्याची माहिती आहे.