नाद करा पण, माझा नको...! डान्स जुगलबंदीत कोंबड्यानं मारलीये बाजी...

बांग देण्यापलीकडे जात कोंबड्याची कमाल; डान्स पाहून म्हणाल 'लाजवाब बेमिसाल'

Updated: Aug 20, 2021, 09:04 PM IST
नाद करा पण, माझा नको...! डान्स जुगलबंदीत कोंबड्यानं मारलीये बाजी...  title=

मुंबई: काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तो व्हिडीओ माणसाचा नाही तर पक्षाचा आहे. पक्षी अनेक मजेच्या गोष्टी करत असतात. तुम्ही बोलणाऱ्या कोंबड्याचा व्हिडीओ पाहिला असेल इतकच नाही तर खांद्यावर बसून गाव फिरणारा कोंबडाही पाहिला असेल. आता या दोघांनाही मागे टाकणारा डान्सिंग कोंबडा आला आहे. 

नाद करायचा नाही. कारण हा कोंबडा भल्याभल्यांना मागे टाकेल इतका सुंदर डान्स करतो आहे. ऐकून विश्वास बसणार नाही. पण त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. बांग देण्यापलीकडे जात कोंबड्याने कमाल केली आहे. हा कोंबड्याचा डान्स पाहून तुम्हीही याला म्हणाल 'लाजवाब बेमिसाल'.

अनेकजण हा व्हिडीओ पाहून आपलं हसणं रोखू शकले नाहीत. या जुगलबंदीमध्ये मात्र कोंबड्याने बाजी मारली असून नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ अडीच हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

या कोंबड्याच्या डान्स पाहून हृतीक रोषनही थक्क होईल असं काही युझर्स म्हणत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की असा नाचणारा कोंबडा आम्ही पाहिला नाही. hepgul5 नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.