मुंबई: रक्षाबंधन जवळ आलं आहे. त्यासाठी आता बहिणी आणि भाऊ दोघंही खास तयारीला लागले आहेत. बहिणी राखी घेण्यासाठी आणि भाऊ आपल्या बहिणींना गिफ्ट देण्यासाठी तयारीला लागले आहेत. यावेळी तुमच्या बहिणीला गिफ्ट देताना मात्र काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुम्ही जर तुमच्या बहिणीला गिफ्ट घेत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.
हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार भावांनी या गोष्टी चुकूनही बहिणीला देऊ नका. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही गिफ्ट करू नयेत त्या आपण जाणून घेऊया.
रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला ओवाळणीमध्ये कोणतीही काचेची गोष्ट देऊ नका. अगदी फ्रेमपासून ते घरातील काचेच्या वस्तूंपर्यंत कोणतीही काचेची वस्तू बहिणीला ओवाळणीत देऊ नये. त्यामुळे बहिणीच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. काचेची कोणतीही वस्तू यंदा तुमच्या बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ नका.
बहिणींना कधीही सुऱ्यांचा सेट गिफ्ट करू नये. त्यामुळे घरात वाद निर्माण होतात असं मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे घरात शांतता रहावी म्हणून त्यांना ही गोष्ट कधीही देऊ नये. याशिवाय काळ्या रंगाचे कपडे तुमच्या बहिणीला गिफ्ट करू नका. काळा रंग हा दु:ख निषेध आणि कष्टाचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे ह्या रंगाचे कपडे कधीच भेट देऊ नयेत.
शुभ मुहूर्तावर घड्याळ, चपला आणि रुमाल भेट देऊ नये. घड्याळ आपली प्रगती रोखण्याचं काम करतं. तर रूमाल कायम प्रत्येकानं स्वत:चा विकत घ्यावा असं म्हटलं जातं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी कधीच भेटवस्तू म्हणून तुम्ही बहिणीला देऊ नयेत. ओवाळणीमध्ये शुभ असेल असं काहीतरी द्यावं. ज्यामुळे बहिणीच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदेल.