मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्कराचा गणवेश घातला आहे. २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पुरोहित यांना २१ ऑगस्टला जामीन मिळाला होता. मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी १७ तारखेला दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. गेल्या 9 वर्षात एटीएस किंवा एनआयएला कर्नल पुरोहित यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करता आलेलं नाही.
पुरोहित यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा दावा पुरोहितांचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
एनआयएनं मात्र अजूनही चौकशी चालू आहे, असं म्हणत जामीनाला विरोध केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुरोहित यांच्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला.