धारवाडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू

 आतापर्यंत 18 जणांना वाचविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Updated: Mar 19, 2019, 09:49 PM IST
धारवाडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू  title=

धारवड : धारवाड मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटना स्थळी दाखल झाले असून मदतकार्य जोरात सुरू आहे. धारवाड मधील कुमारवेश्वर इथे ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी मदतकार्य जोरात सुरू आहे. चार जेसीबीच्या साहायाने ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. अजूनही मदतकार्य सुरू असून पहिल्या मजल्यावरील अनेकजण सापडले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. 

तीन वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आल्याची माहिती स्थानिक सांगत आहेत. दरम्यान आतापर्यंत 18 जणांना वाचविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाला तातडीने मदत पोहचविण्याचे आदेश मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शंभरहून अधिक जण या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अनेकजण आपल्या जवळच्यांना या ढिगाऱ्याखाली शोधत आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारही मोठ्या प्रमाणात इथे जमा झाले आहे. 
जखमींना धारवड येथील तर काहींना बेळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.