ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील सर्वसामान्यांसाठी खुशखबर; LPG च्या किंमतींमध्ये मोठी घट

Commercial Cylinder Rate Today : ऑगस्ट महिन्याची सुरुवात एका आनंदाच्या बातमीने झाली आहे. सरकारने कमर्शियल सिलेंडरच्या दरात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहेत. आज पासून बदलले दर लागू होतील, ते जाणून घेऊयात...

Updated: Aug 1, 2022, 09:36 AM IST
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील सर्वसामान्यांसाठी खुशखबर; LPG च्या किंमतींमध्ये मोठी घट title=

Commercial Cylinder Price Today : सध्याच्या महागाईच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. नवीन दर आजपासूनच (1 ऑगस्ट) लागू होणार आहे. कमर्शियल सिलेंडर तब्बल 36 रुपयांनी कमी झालं आहे. आजपासून 19 किलो कमर्शियल सिलेंडर विकत घेण्यासाठी मुंबईमध्ये आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये 19 किलो कमर्शियल सिलेंडर खरेदी करण्यासाठी 2012.50 रुपयांच्या ऐवजी 1976.50 रुपये तर कोलकत्तामध्ये  2095.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, चेन्नईमध्ये सिलेंडर 2141 रुपयांना विकत मिळणार आहे.

घरगूती सिलेंडरच्या किंमतींची स्थिती 'जैसे थे'

मुंबईमध्ये घरगूती LPG सिलेंडरसाठी 1052 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये घरगूती सिलेंडरची किंमत 1053 रुपये इतकी आहे तर कोलकत्तामध्ये LPG सिलेंडरची किंमत 1079 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये याच सिलेंडरची किंमत 1068 रुपये इतकी आहे.

जुलै महिन्यातसुद्धा कमर्शियल सिलेंडरच्या दरांत घसरण

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी झाली होती. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरसाठी 1972.50 रुपये मोजावे लागले. त्याचबरोबर, दिल्लीमध्ये हा सिलेंडर 2012.20 रुपयांमध्ये,  कोलकत्तामध्ये 2132 रुपयांना तर चेन्नईमध्ये 2177.50 रुपयांना विकले जात होते.

घरगूती सिलेंडरच्या किंमती

घरगूती सिलेंडरची किंमत 6 जुलैला 50 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ झाली होती. जागतिक स्तरावर वीजेच्या किंमती वाढल्यामुळे मे महिन्यापासून एलपीजीच्या किंमतींमध्ये तीसऱ्यांदा वाढ झाली आहे.