close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भाजप खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

भाजपच्या सर्व खासदारांना आज शाह मंत्र मिळणार आहे.  

Updated: Sep 21, 2019, 12:57 PM IST
भाजप खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

नवी दिल्ली : भाजपच्या सर्व खासदारांना आज शाह मंत्र मिळणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज सर्व भाजप खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद होणार आहे. सर्व राज्यातल्या भाजप खासदारांना त्यासाठी आपापल्या राज्य मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त अमित शाह खासदारांशी हा संवाद साधणार आहेत. 

दरम्यान,  २२ सप्टेंबरला भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार असून, त्यांच्याकडून याबाबत  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा ते आढावा घेण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याची उत्सुकता असून ते युतीबाबत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.