काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर, कुमारी शैलजा- दीपेंद्र हुड्डांना पुन्हा संधी

काँग्रेसने यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४०४ उमेदवार घोषित केले आहेत.  

Updated: Apr 13, 2019, 11:22 PM IST
काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर, कुमारी शैलजा- दीपेंद्र हुड्डांना पुन्हा संधी

नवी दिल्ली : काँग्रेसने यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४०४ उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने काल सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आज पुन्हा आणखी एक यादी जाहीर केली आहे. यावेळी चार वेळा खासदार राहिलेले दीपेंद्र हुड्डा यांना संधी देण्यात आली आहे. हरियाणातील अंबाला येथून कुमारी शैलजा यांनी संधी देण्यात आली आहे. त्याआधी मंत्री राहिल्या आहेत. काँग्रेसने हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील १८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल मध्यप्रदेशमधून माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर केले होते. 

दीपेंद्र हुड्डा यांचे वडील भुपेंद्र हुड्डाही चारवेळा खासदार राहिलेले आहेत. तर हरियाणातील सिरसामधून अशोक तंवर यांना पक्षाने संधी दिली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वॉलिअर मतदारसंघातून पक्षाने अशोक सिंह यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनी शिंदे यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना ती मिळालेली नाही. उत्तर प्रदेशच्या गोंडा मतदारसंघातून अपना दलच्या कृष्णा पटेल यांना संधी देण्यात आली आहे. कृष्णा पटेल यांच्या अपना दलने काँग्रेसही युती केली असून ते काँग्रेसच्याच निवडणूक चिन्हावर लढत आहेत. तर त्यांची मुलगी अनुप्रिया पटेलने भाजपशी युती केली आहे.