फोटोग्राफरच्या मदतीला असे धावले राहुल गांधी

फोटोग्राफर पडताना पाहताच राहुल गांधी फोटोग्राफरकडे धावले.

Updated: Jan 25, 2019, 01:14 PM IST
फोटोग्राफरच्या मदतीला असे धावले राहुल गांधी title=

भुवनेश्वर : राहुल गांधी यांचा फोटो काढत असताना एक फोटोग्राफर अचानक मागच्य़ा बाजुला पडला. फोटोग्राफर पडताना पाहताच राहुल गांधी या फोटोग्राफरकडे धावले आणि त्याला हात देत उठवलं. यानंतर त्याला कुठे लागलं तर नाही. याबाबत देखील विचारपूस राहुल गांधी यांनी केली. भुवनेश्वर विमानतळाजवळ ही घटना घडली. राहुल गांधी हे कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना फोटोग्राफर त्यांचा फोटो काढत होता. पण यादरम्यान तो कठड्यावरुन मागच्या बाजुला पडला. राहुल गांधी यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या फोटोग्राफरच्या दिशेने धाव घेतली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ओडिशा दौऱ्यावर आहेत. येथे एका रॅलीला तो संबोधित करणार आहेत. येथून ते पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा वाढल्यानंतर राहुल गांधी हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. येथे काँग्रेसच्या अनेक नेत्य़ांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षाला एकजुट करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यापुढे असणार आहे. २ काँग्रेस आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी येथे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.