Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला.   

Updated: Jan 30, 2023, 11:27 AM IST
Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट  title=
congress Rahul Gandhi Bharat Jodo yatra to end today in Srinagar

Bharat Jodo Yatra in Srinagar : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं ते म्हणजे भारत जोडो यात्रेचं. तामिळनाडूपासून (Tamilnadu) सुरु झालेला त्यांचा हा प्रवास 14 राज्य ओलांडून तब्बल 3970 किमी इतका प्रवास करून आता जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर (Srinagar) येथे पोहोचली. तिथंच या यात्रेचा समारोप होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांशी संवाद साधत त्यांनी हा प्रवास इथवर आणला, अनेकांनाच यासाठी त्यांचा हेवाही वाटला. या संपूर्ण प्रवासादरम्यान राहुल गांधी यांच्यापुढं काही असे खुलासे झाले जे ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसेल. (congress Rahul Gandhi Bharat Jodo yatra to end today in Srinagar)

भारतातील हजारो किमी जमीन चीनकडे? 

सेवानिवृत्त सैनिक आणि (Ladakh) लडाखमधील अनेक नागरिकांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्यापुढे बरेच मोठे खुलासे झाले. देशातील तब्बल 2 हजार किमी जमीन चीनच्या (China) ताब्यात असल्याची खळबळजनक बाब त्यांच्यासमोर आली आणि याकडे त्यांनी सरकारचंही लक्ष वेधलं. भारताकडून असणाऱ्या गस्त घालण्यासाठीचे तळ चीननं बळकावले आहेत, स्थानिकांकडून देण्यात येणाऱ्या या माहितीकडे केंद्रानं याकडे दुर्लक्ष केल्यास चीन फोफावेल अशी भीतीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 

हेसुद्धा वाचा : IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय? 

काश्मीरला (Kashmir) राज्याचा दर्जा देत इथं लोकशाही प्रस्थापित होणं गरजेचं असल्याच्या मतावर त्यांनी अधिक जोर दिला. काश्मीरमध्ये परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली असून, इथं निरपराधांचे जीव धोक्यात असल्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा प्रकाशात आणत या भागासंबंधी भाजपनं केलेले सर्व दावे फोल असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

भूतकाळ विसरून भविष्याच्या दिशेनं जाणार... 

भूतकाळातील उणीधुणी न काढता आता भविष्याचेच वेध आपल्याला लागल्याचं म्हणत या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकायला मिळाल्याचंही राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. हा अनुभव समृद्ध करणारा होता असं सांगताना त्यांनी आपण लाखोंच्या संख्येनं नागरिकांना भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला असं सांगत देशातील सद्यस्थितीवर लक्ष वेधलं. सध्या देशातील हिंसा आणि द्वेषपूर्ण वातावरणाची नागरिकांना चीड येत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.