श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले.
झहीर अब्बास असे शहीद झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. अद्यापही गोळीबार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय जवानांकडून परिसरात शोधमोहीम जारी आहे. ही चकमक मीर मोहल्या गावात सुरू आहे. बांदिपोरातील हाजीन इलाक्यात येणाऱ्या या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहीत मिळताच भारतीय जवान, सुरक्षा दलाचे जवान आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई सुरू केली.
#UPDATE J&K: Two terrorists killed in an encounter with security forces in Bandipora's Hajin; firing stopped, heavy stone pelting underway. pic.twitter.com/ix7WNB4jrq
— ANI (@ANI) October 29, 2017
दरम्यान, दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार सुरू केला. या वेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी मारले गेले. गोळीबार झाल्यावर परिसरात दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे.