Hanuman Birth Place Controversy | हनुमान चालिसानंतर आता हनुमान जन्मभूमीचा वाद

हनुमान चालिसावरून राज्यात वातावरण तापलं असतानाच, आता हनुमान जन्मभूमीवरून (Hanuman Controversy) नवा वाद सुरू झालाय.

Updated: May 28, 2022, 11:25 PM IST
Hanuman Birth Place Controversy | हनुमान चालिसानंतर आता हनुमान जन्मभूमीचा वाद title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : हनुमान चालिसावरून राज्यात वातावरण तापलं असतानाच, आता हनुमान जन्मभूमीवरून (Hanuman Controversy) नवा वाद सुरू झालाय. हनुमानाचा जन्म नेमका कुठं झाला? यावरून दावे-प्रतिदावे केले जातायत.पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. (controversy on to hanuman birth place anjaneri or kishkindha)

मारूतीराया तुझा जन्म नेमका कुठला? असा प्रश्न थेट हनुमानालाच विचारण्याची वेळ आलीय. कारण त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याची आपली श्रद्धा आहे. हनुमानाची माता अंजनी हिच्यावरूनच अंजनेरी हे नाव पडलं. इथं अंजनीमातेचं आणि हनुमानाचंही मंदिर आहे. 

मात्र कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावा किष्किंधा देवस्थानचे आचार्य गोविंदानंद महाराज यांनी केलाय. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचे दाखले दिलेत.

हनुमान जन्मभूमीवरून 'महाभारत' 

केवळ अंजनेरी आणि किष्किंधाच नव्हे तर देशात 9 ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा केला जातोय. नाशिक, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटकमध्ये हनुमान जन्म झाल्याचं सांगण्यात येतंय. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केलाय.

हनुमान जन्मवादाबाबत त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित धर्मसभेत शास्त्रोक्त वादविवाद झाला. त्यात किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी, तर अंजनेरी ही तपोभूमी असल्याचं सांगण्यात आलं. मात्र नाशिकच्या महंतांनी आणि पंडितांनी हा दावा फेटाळून लावलाय.

हनुमान जन्मस्थळाचा हा वाद सामोपचारानं सोडवावा, यासाठी येत्या 31 मे रोजी नाशिकमध्ये पुन्हा एकदा धर्मसभा भरवण्यात येणाराय. यात हनुमान नेमका कुणाचा? याचा अंतिम फैसला होईल, अशी आशा आहे.