नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असून साथीच्या आजाराची तीव्रताही वाढली आहे. हे पाहता, पुढचे चार आठवडे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. संसर्गाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी सरकारने सामान्य लोकांच्या सहभागावरही भर दिला आहे.नीती आयोगाचे सदस्य (हेल्थ) डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, 'झपाट्याने वाढत असलेल्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती आणखीनच बिघडू लागली आहेत आणि लोकसंख्येचा एक मोठा भाग संक्रमणास बळी पडला आहे. संक्रमणाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो.'
डॉ. पाल म्हणाले की, 'साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी, बाधित भागाची ओळख पटविणे, तपासणी इत्यादींचे नियम अधिक प्रभावीपणे राबवावेत, वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि त्वरित लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे.'
पॉल म्हणाले की, 'साथीच्या रोगाची तीव्रता वाढली आहे आणि ती मागील वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे. काही राज्यांत परिस्थिती इतरांपेक्षा वाईट आहे. परंतु देशभरात संसर्ग होण्याचे प्रकार वाढत आहेत. दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. पुढील चार आठवडे खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. संपूर्ण देशाला संघटित होऊन प्रयत्न करावे लागतील.'
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सक्रिय प्रकरणात छत्तीसगडचा दुर्ग जिल्हा पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी एक आहे. सर्वाधिक सक्रिय प्रकरणे असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये दुर्गव्यतिरिक्त महाराष्ट्र, पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्राने उच्च स्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके तयार केली असून त्यापैकी महाराष्ट्रात 30, छत्तीसगडमध्ये 11 आणि पंजाबमध्ये नऊ पथके पाठवण्यात आली आहेत.'
देशात 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना लसी देण्याच्या मागणीसंदर्भात भूषण म्हणाले की, या क्षणी ही लस फक्त ज्या लोकांना आवश्यक असेल त्यांना दिली जाईल. साथीमुळे होणारे मृत्यू रोखणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ते म्हणाले की, जगातील भारत हा एकमेव असा देश आहे जेथे 45 वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील सर्व लोकांना लसी दिली जात आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की, कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी जगातील सर्व देश प्रथम फ्रंट लाईन वर्कर्सला लसी देतात. भारतात लसीकरणाची गती जगातील सर्वात वेगवान आहे. अमेरिका हा एकमेव असा देश आहे जिथे भारतापेक्षा जास्त लस दिल्या गेल्या आहेत. पण इथे लसीकरण एक महिन्यापूर्वी सुरू झालं होतं.