Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Update :  गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 9, 2023, 01:19 PM IST
 Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End,  तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती title=
Corona Update

Corona Virus in India : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी  केंद्रीय पथकही पाठवण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील कोविड-19 (Covid 19) टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग दाखवला आहे. तरीही सर्वसामान्यांमधील कोरोनाची धास्ती अद्याप संपली नाही. त्यातच आता कोरोनासंदर्भात (Corona Virus) मोठी अपडेट समोर येत आहे. लवकरच कोरोनाची रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

दिल्लीसह देशाच्या विविध भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसची प्रकरणे वाढू लागली आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. अशातच कोरोनाच्या नवीन प्रकरणाबद्दल तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. दोन ते चार आठवड्यांत कोरोनाचे रुग्ण कमी होऊ शकतात. मात्र यासाठी लोकांनी कोरोनाशी संबंधित नियमांचे योग्य पालन केले पाहिजे. लसीकरणामुळे रोग आणि मृत्यूपासून संरक्षण मिळेल परंतु संसर्गापासून नाही, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांची सोय व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. पुढील तीन ते सहा महिन्यांत तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

वाचा: कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत? 

तज्ञांनी सांगितले की, कोरोना XBB.1.16 च्या नवीन प्रकरणाचा संसर्ग वाढत चालला आहे. अशावेळी आता जास्त काळजी करण्याची गरज नाही. पुढील 2-3 आठवड्यांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण होऊनही लोकांना फारसा त्रास होत नसल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे. तसेच कोरोना होऊनही काही लोकांच्या चाचण्याही होत नाहीत. असे नाही झाले तर कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. मात्र, ही परिस्थिती पाहता बहुतेक बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या

देशात शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत कोरोना विषाणूचे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह, सक्रिय प्रकरणांची संख्या 31,194 झाली आहे. मात्र, या काळात भारतात कोरोना विषाणूमुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, दिल्लीत कोविड -19 चे 535 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे संसर्ग दर 23.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.