'त्या' महिलेमुळे ७७ जणांना कोरोनाची लागण?

तिच्या एका कृतीमुळे...... 

Updated: Mar 16, 2020, 03:51 PM IST
'त्या' महिलेमुळे ७७ जणांना कोरोनाची लागण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : कोरोना Corona व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत असले तरीही या व्हायरसविषयी अनेकांच्या मनात असणारी भीती कमी करण्याचंही आवाहन प्रशासनापुढे आहे. तणाव आणि गोंधळाच्या याच वातावरणात काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील विलगीकरण कक्षातून एका महिलेने पळ काढला होता. 

विलगीकरण कक्षातून पळ काढल्यानंतर ही महिला आग्रा येथे पोहोचलेली. यादरम्यान तिने 'गतिमान एक्स्प्रेस'ने प्रवास केला. कोरोनाचा वाढता धोका पाहता आता त्या महिलेने रेल्वेच्या ज्या बोगीने प्रवास केला होता, त्या डब्याला रेल्वेने वेगळं काढलं आहे. कोच वेगळा करुन सध्याच्या घडीला त्याचं निर्जंतुकीकरणाचं काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यावेळी कोचमध्ये एकूण ७७ प्रवासी होते. 

प्रवाशांच्या दृष्टीने सावधगिरीचं पाऊल टाकत आता रेल्वेकडून त्यांची सर्व माहिती सरकारकडे सोपवण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून या प्रवाशांवर नजरही ठेवली जात आहे. १४ दिवसांपर्यंत या प्रवाशांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. 
संबंधित महिला ही पतीसोबत इटलीला गेली होती. त्या ठिकाणहून हे दोघंही फ्रान्स आणि ग्रीस येथेही गेले होते. या महिलेचा पती बंगळुरूमध्ये इंजिनियर आहे. हे दोघंही २७ फेब्रुवारीला जेव्हा बंगळुरूला आले, तेव्हा तिच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. पण, या महिलेने या कक्षातून पळ काढला आणि ती बंगळुरूहून थेट दिल्लीला पोहोचली. इथे ती गतिमान एक्स्प्रेसने आग्र्यापर्यंत पोहोचली. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

पुढे या महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. बंगळुरू येथून ती तिच्या माहेरी दिल्लीला इतर आठजणांसोबत राहत होती. सध्याच्या घडीला त्या महिलेच्या कुटुंबीयांनाही विलगीकरण लक्षात नेण्यात आलं आहे. आग्रा येथे या महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणत, अडचणी निर्माण करण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. शिवाय तिच्या कुटुंबीयांवर संक्रमित महिलेला लपवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.