गोवा कोरोनामुक्त होण्याची ७ ठळक कारणं

देशभरात १४ हजारहून अधिक कोरोनाबाधित 

Updated: Apr 18, 2020, 03:29 PM IST
गोवा कोरोनामुक्त होण्याची ७ ठळक कारणं  title=

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. आतापर्यंत देशात १४ हजार ३७८ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनापासून संपूर्ण देश दोन हात करत असताना गोवा हे राज्य मात्र कोरोनामुक्त झालं आहे. कोरोनाने भारतात परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांमार्फत प्रवेश केला. गोवा हे तर परदेशी पर्यटकांच सर्वात आवडतं पर्यटन स्थळं. असं असलं तरीही गोवा आता कोरोनामुक्त झाला आहे. 

गोव्यात सात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये सहा परदेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. एक कोरोनाबाधिताला आपल्या परदेशातून आलेल्या भावामुळे कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. कोरोनाशी लढण्यासाठी गोवा सरकारने कोणती महत्वाची पाऊलं उचलली ज्यामुळे आज हे राज्य कोरोनामुक्त झालं आहे. 

गोवा कोरोनामुक्त होण्याची ठळक कारणं 

१. केंद्र सरकारने दिलेले सर्व नियम गोव्यात काटेकोरपणे पाळले गेले. 

२. अगदी सुरूवातपासूनच गोव्यात कडर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

३. गोव्यात सीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आलं होतं. 

४. गोव्याच्या सर्व सीमा सिल करण्यात आल्या होत्या. कुणालाही गोव्यात येण्यास अथवा गोव्यातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. 

५. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाबाधित रूग्णांच्या घरावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. यामुळे शेजारील व्यक्तीस देखील याची माहिती मिळत असल्यामुळे सतर्कता बाळगली जात होती. 

६. गोव्यात पर्यटकांचा येण्याचा सर्वाधिक काळ हा फेब्रुवारीपर्यंत असतो. यानंतर गोव्यात उष्णता अधिक असते. यामुळे गोव्यात आलेले परदेशी पर्यटक हे फेब्रुवारी महिन्या अगोदरच आले होते. 

७. तसेच गोव्यात आलेल्या सर्व परदेशी पर्यटकांची कोरोना चाचणी करून त्यांना विमानाने त्यांच्या त्यांच्या देशात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.