Coronavirus: देशात होणारा कोरोनाचा विस्फोट? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पुन्हा पत्र

चीनमध्ये तर कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अशातच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पुन्हा एकदा आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह आणखी एक पत्र लिहिलंय.

Updated: Dec 24, 2022, 10:34 PM IST
Coronavirus: देशात होणारा कोरोनाचा विस्फोट? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पुन्हा पत्र title=

Coronavirus India Update: चीनसह (China) काही देशांमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये तर कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे मोठा ताण पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्टवर आलंय.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पुन्हा एकदा आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह आणखी एक पत्र लिहिलंय. यापूर्वी देशभरातील सर्व आरोग्य संस्थांना 27 डिसेंबर रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितलंय.

राजेश भूषण यांनी पत्रात लिहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी-

  • राज्यांना रुग्णालयं त्याचप्रमाणे बेड्सची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
  • आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सिजन बेड त्याशिवाय व्हेंटिलेटरसह पुरेशा प्रमाणात बेड्सची सुविधा आहे की नाही याची खात्री करणं.
  • रुग्णालयांमध्ये कार्यरत पुरेसे डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी
  • टेस्ट कॅपेसिटी वाढवावी
  • वैद्यकीय ऑक्सिजन, मास्क, औषधं, पीपीई किटसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्याच्या सूचना

केंद्र सरकारचं कठोर पाऊल

या पार्श्वभूमीवर भारत सरकराने (Central Government) पहिलं कठोर पाऊल उचललं आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची एअरपोर्टवर (Airport) RTPCR केली जाणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, बँकॉकमधून येणाऱ्या नागरिकांची RTPCR केली जाणार आहे. या टेस्टमध्ये कुणी पॉझिटीव्ह (Positive) आढळलं, तर त्यांना क्वारंटाईनही (Quarantine) केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिलीय.

मुंबई विमानतळावर नियमांची अंमलबजावणी

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांना पोस्ट अरायव्हल चाचणी करावी लागणार आहे. अएरलाईन्सच्या माहितीच्या आधारे अशा प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली जाणार आहे.