गोव्‍यात कोरोनाच्या रुग्‍णाबाबत संभ्रम, आरोग्य मंत्र्यांचा दावा मागे

गोव्‍याची राजधानी पणजी येथे कोरोनाचा पहिला रूग्‍ण आढळला आहे, असा दावा करण्यात आला होता.  

Updated: Mar 18, 2020, 04:32 PM IST
गोव्‍यात कोरोनाच्या रुग्‍णाबाबत संभ्रम, आरोग्य मंत्र्यांचा दावा मागे title=

मुंबई : गोव्‍याची राजधानी पणजी येथे कोरोनाचा पहिला रूग्‍ण आढळला आहे, असा दावा करण्यात आला होता. दरम्यान, गोव्यात कोरोनाचे चार संशयित रुग्णावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी कोरोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती दिली होती. मात्र, काही वेळांनी त्यांनी आपला दावा मागे घेतला. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

गोव्यात कोरोनाचा रुग्‍ण हा नार्वेचा नागरिक असल्याचे सांगण्यात येत होते. तो २४ वर्षीय आहे. फेब्रुवारी महिन्‍यात तो भारतात आला होता. यानंतर त्‍याने दिल्‍ली, आग्रा, आसाम, मेघालय आणि गोवा असा प्रवास केला आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना विशेष कक्षात त्‍याला ठेवण्‍यात आले आहे. त्‍याच्‍या उपचार सुरू असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली. 

कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.  अनेक पर्यटक गोव्यात येत आहेत त्यामुळे गोवा राज्याच्या सीमा बंद करून या पर्यटकांवर एक ते दोन महिन्यासाठी बंदी आणण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. 

तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातून समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत आणि भविष्यात यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून बंदी आणण्याचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. आपण दोन ठिकाणाहून गरजेच्या वस्तू राज्यात योग्य तपासणी करून आणू शकतो, यावर आम्ही काम करत आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याबाबतची फाईल पाठविण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.