देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण

कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा...

Updated: May 5, 2020, 11:40 AM IST
देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3900 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

भारतात एकूण 46 हजार 433 कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी 32 हजार 134 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशात आतापर्यंत 12 हजार 727 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1568 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

देशात, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल गुजरात कोरोनाबाधितांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 14 हजार 541 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आतापर्यंत 2 हजार 465 लोक कोरोनामुक्त झाले असून मृतांची संख्या 583वर गेली आहे.

गुजरातमध्ये 5 हजार 804 कोरोनाग्रस्त असून कोरोनामुळे 319 जणांचा बळी गेला आहे. गुजरातमध्ये 1195 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 

दिल्ली कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत आतापर्यंत 4 हजार 898 जणांना कोरोनाची लागण झाली आहेत. दिल्लीत 1431 जण कोरोनामुक्त झाले असून 64 जण दगावले आहे.

राजस्थान 3061, तमिळनाडू 3550, पंजाब 1233, तेलंगाणा 1085, उत्तरप्रदेश 2766 तर मध्य प्रदेशमध्ये 2942 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

अरुणाचल प्रदेश 1, मणिपूर 2 तर मिझोराममध्ये 1, पदुच्चेरी 8, त्रिपुरामध्ये 29 कोरोनाबाधित आढळले आहेत. गोव्यात 7 कोरोनाग्रस्त आढळले होते. मात्र सातही जण कोरोनातून बरे झाले असल्याने आता गोव्यात एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळ गोवा राज्य कोरोनामुक्त झालं आहे.