नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता इतकी भयंकर आहे की, गेल्या काही दिवसातच 10 लाखापेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एक्टिव रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचाही आकडा वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात देशात एकून 1 लाख 45 हजार 384 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. दरम्यान, 77 हजाराहून अधिक रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर 794 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 एप्रिल पर्यंत 9 कोटी डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांपासून 50 हजारापेक्षा अधिक रुग्णांची दररोज नोंद होत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 8521 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील लोकांचे लसीकरण केले जात आहे. देशात सध्या मृत्यू दर 1.27 तर रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्के आहे.