बालाकोटमध्ये नक्की किती दहशतवादी मारले? भाजप नेत्यांचा सावळागोंधळ

एअर स्ट्राईकपूर्वी बालाकोटच्या तळावर ३०० मोबाईल फोन सक्रिय

Updated: Mar 6, 2019, 10:39 AM IST
बालाकोटमध्ये नक्की किती दहशतवादी मारले? भाजप नेत्यांचा सावळागोंधळ title=

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने पाकच्या हद्दीत शिरुन जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले, यावरून सध्या भाजप नेत्यांचा गोंधळ उडालेला दिसत आहे. भाजपच्या नेत्यांकडून याबाबत आतापर्यंत परस्परविरोधी विधाने करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या काळात सरकारमधील सूत्रांनी बालाकोटमध्ये केवळ ३० दहशतवादीच मारले गेल्याचे सांगितले होते. मात्र, अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत २५० दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. ही गुप्त माहिती अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचलीच कशी, यावरून वादही निर्माण झाला होता. त्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांना अमित शहा यांच्या बचावासाठी पुढे यावे लागले होते. भारतीय लष्कराच्या कारवाईवर अशाप्रकारे शंका घेणे, योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 

एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का ?

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी तर एअर स्ट्राईकमध्ये ४०० दहशतवादी मारले गेल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मृत दहशतवाद्यांचा नेमका आकडा सांगायला नकार दिला होता. मात्र, एअर स्ट्राईकपूर्वी बालाकोटच्या तळावर ३०० मोबाईल फोन सक्रिय असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, तरीही विरोधकांना नेमका आकडा जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन शिरगणती करावी, असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला होता. 

पुलवामा हल्ल्याला 'दुर्घटना' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं