Nirmala Sitharaman : 'देशाला आर्थिक मंदीचा धोका नाही', अर्थमंत्र्यांचे संसदेत प्रतिपादन

जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनला देखील याचा फटका बसला आहे.

Updated: Aug 2, 2022, 10:39 AM IST
Nirmala Sitharaman : 'देशाला आर्थिक मंदीचा धोका नाही', अर्थमंत्र्यांचे संसदेत प्रतिपादन title=

नवी दिल्ली : जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनला देखील याचा फटका बसला आहे. असं असलं तरी, भारतात मात्र या आर्थिक मंदीचा कसलाही परिणाम नाहीये. असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी भारतीय संसदेत केला.  

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण लोकसभेत (Lok Sabha) असं म्हणाल्या की, विविध प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. सध्या देशामध्ये आर्थिक मंदीची 0% शक्यता आहे.  

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाला बोलताना त्या म्हणाल्या की, 'काही सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांव्यतिरीक्त इतर सदस्यांचे मुद्दे हे महागाईच्या आकडेवारीवरून निर्माण होणाऱ्या खऱ्या चिंतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकीय दृष्टीकोनातून जास्त आहेत म्हणून मीसुद्धा थोडं राजकीय उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.'

सीतारमण म्हणाल्या की, 'सध्या जगभरात काय घडत आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था कुठे आहे. त्याचबरोबर,  कोरोना व्हायरस (Corona Virus) विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, जगाने याआधी अशी महामारी कधीही पाहिली नव्हती. आपण सर्वांनी आपआपल्या मतदार क्षेत्रात जनतेला आधिकाधीक मदत करण्याचा प्रयत्न केला.

महामारीच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी सर्वजन (केंद्र आणि राज्य सरकार) आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. नाहीतर भारत त्या ठिकाणी नसता जिथे जगातील इतर देशांच्या तुलनेत आहे. याचं श्रेय मी आपल्या देशाच्या नागरिकांना देते. असंही सीतारमण यांनी म्हटलं.

बिकट परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित

अर्थमंत्री म्हणाल्या की, गेल्या 2 वर्षांत जागतिक बँक, IMF आणि इतर जागतिक संस्थांनी जागतिक विकास दर आणि भारताच्या विकास दराबाबत अनेक वेळा मूल्यांकन जारी केले आहेत. बिकट परिस्थिती असूनही, सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या गेलेल्या स्थितीत आपण खंबीरपणे उभे आहोत.

त्या म्हणाल्या की, प्रत्येक वेळी त्यांनी (जागतिक संस्थांनी) जगाचा विकास दर त्या कालावधीतील अंदाजापेक्षा कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा विकास दरही अंदाजापेक्षा कमी होता, परंतु प्रत्येक वेळी आपला विकास दर जगाच्या इतर भागांपेक्षा अधिक अंदाजित करण्यात आला आहे.

भारतात मंदीचा कोणताही धोका नसल्याचं ब्लूमबर्गने म्हटलंय

सीतारामन म्हणाल्या, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, पहिल्या तिमाहीत 1.6% च्या घसरणीच्या तुलनेत अमेरिकेच्या GDP मध्ये 0.9% ची घसरण झाली आहे. जागतिक संस्थांनी याला अनौपचारिक आर्थिक मंदी असं नाव दिलं आहे, पण मंदी किंवा महागाईमुळे भारतातील आर्थिक मंदीचा प्रश्नच निर्माण होत नाही. ब्लूमबर्गने आपल्या सर्वेक्षणात असंही म्हटलं आहे की भारतात आर्थिक मंदीची शक्यता 0% आहे.

अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधकांचा बहिष्कार

दरवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेवेळी अर्थमंत्र्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. काँग्रेसच्या सर्व खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. त्यानंतर काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले की, अर्थमंत्र्यांचं उत्तर अत्यंत निराशाजनक आहे. देशात महागाई नाही आणि लोकांचे हाल होत नाहीत, अशी सरकारचे म्हणणे आहे. 140 कोटी जनतेचा आवाज उठवणाऱ्या विरोधकांच्या चिंतेवर तुमची ही प्रतिक्रिया असेल तर ते का ऐकायचं?.

रघुराम राजन काय म्हणाले?

आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन म्हणाले की, भारतातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) वाढवण्यासाठी आरबीआयने चांगलं काम केलं आहे. यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या शेजारी देशांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून भारताची सुटका होईल.

The country is not in any danger of economic recession Union Finance Minister Sitharaman