मुंबई : Coronavirus in India : भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासांत देशात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेत देशात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3 लाख 17 हजार 532 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 491 जणांचा या साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
देशात 8 महिन्यांनंतर कोविड-19 च्या नवीन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, 15 मे 2021 रोजी 3.11 लाख नवीन रुग्ण आढळले होते.
India reports 3,17,532 new COVID cases, 491 deaths, and 2,23,990 recoveries in the last 24 hours.
Active case: 19,24,051
Daily positivity rate: 16.41%9,287 total Omicron cases detected so far; an increase of 3.63% since yesterday pic.twitter.com/L4KnawIEAd
— ANI (@ANI) January 20, 2022
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 23 हजार 990 लोक कोविड-19 साथीच्या आजारातून बरे झाले असले तरी सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 519 ने वाढली आहे. यासह, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या (Coronavirus Active Case in India) 19 लाख 24 हजार 51 वर पोहोचली आहे.
देशात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे पॉझिव्हिटि रेट म्हणजेच संसर्ग दर देखील 16 टक्क्यांच्या वर गेला आहे. देशातील दैनंदिन संसर्ग दर 16.41 टक्के, तर साप्ताहिक संसर्ग दर 16.06 टक्के झाला.
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही 9 हजारांच्या पुढे गेली असून गेल्या 24 तासांत ओमिक्रॉनचे 9287 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कालच्या तुलनेत 3.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे.