कोविड-19 : नव्या गाईडलाईन्स लवकरच, आता यांना मिळणार मुभा

कोरोनामुळं (coronavirus) गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्विमींग पूल पुन्हा सुरू होणार आहेत. सिनेमागृहातील (Cinema) 50 टक्के क्षमतेची मर्यादा देखील रद्द करण्यात आली आहे. 

Updated: Jan 28, 2021, 07:44 AM IST
कोविड-19 : नव्या गाईडलाईन्स लवकरच, आता यांना मिळणार मुभा  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : कोरोनामुळं (coronavirus) गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्विमींग पूल पुन्हा सुरू होणार आहेत. सिनेमागृहातील (Cinema) 50 टक्के क्षमतेची मर्यादा देखील रद्द करण्यात आली आहे. (Cinema halls and theatres have already been permitted upto 50% of seating capacity) त्यामुळे सिनेमागृहातील प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. याबाबतच्या नव्या गाईडलाईन्स लवकरच केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र त्याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेते, हे देखील महत्त्वाचं असणार आहे. (Union Home Ministry issues an order to enforce guidelines for surveillance, containment and caution which will be effective from Feb 1 to Feb 28)

यांना  घराबाहेर पडण्याची मुभा 

नव्या गाईडलाईन्सनुसार 65 वर्षांवरील वृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना देखील घराबाहेर पडण्याची मुभा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध देखील उठवण्यात येणार आहेत. तर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.

स्विमिंग पूल जास्त क्षमतेने वापरता येणार 

केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत. त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. 

सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल. राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.