चार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य

Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला. 

Updated: May 28, 2023, 04:21 PM IST
 चार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य  title=
Crime News Father end life A four year old child was made to make a video trending news on google

Crime News : मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत केलेल्या भयानक आणि धक्कादायक कृत्याने पोलिसांसोबतच सगळ्यांना हादरुन सोडलं आहे. वडिलांनी चार वर्षाच्या मुलाकडून आयुष्य संपवतानाचा व्हिडीओ काढण्यासाठी सांगितला. संतापजनक म्हणजे हे कृत्य तो दारुच्या नशेत केलं आहे. त्या व्यक्तीने घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं नाव शेख जमाल बाली असं आहे. घटनेच्या दिवशी जमाल घरातील आतल्या खोलीत गेला आणि मुलाला व्हिडीओ काढायला सांगितला. वडिलांचं धक्कादायक कृत्य पाहून मुलाला शॉक बसला आणि त्याने आरडाओरड करायला सुरु केली. मुलाचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली, पण उशीर झाला होता. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्याने नैराश्यातून हे धक्कादायक कृत्य केलं. गेल्या काही महिन्यांपासून तो दारुच्या आहारी गेला होता. त्याची पती व्यवसायासाठी परदेशात कुवेतमध्ये राहते. तर हा व्यक्ती ट्रक चालक होता. त्याचा कुटुंबात आई, बहीण, तीन मुली आणि एक मुलगा आहे. 

कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्यांचा मुलाने वडिलांच्या निधनानंतर ड्रग्स घेण्यास सुरुवात केली होती. घटनेच्या दिवशीही जमाल खूप दारु पिऊन आला होता. दरम्यान पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील आहे. (Crime News Father end life A four year old child was made to make a video trending news on google)

दारुच्या व्यसनामुळे तासातासाला अनेक संसार आणि अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मात्र वडिलांनी चार वर्षाच्या मुलाकडून व्हिडीओ काढून घेतल्यामुळे त्याचं हे भयानक कृत्य त्या मुलावर काय परिणाम करेल. त्या चिमुकल्यासाठी हा घात आयुष्यभर सोबत राहणार आहे. त्यातून उभरण्यासाठी त्या चिमुकल्याला बळ मिळू दे, ही प्रार्थना.