कानपूर : आपल्यासमोर अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये नवरे आपल्या बायकांपासून लपवून बाहेर लफडी करतातय अशा प्रसंगात काही केसेसमध्ये त्यांच्या बायकोला यासंदर्भात काही माहिती नसते, तर काही केसेसमध्ये बायको आपल्या नवऱ्याला रंगेहात पकडते आणि त्यानंतर अशा लोकांसंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले जातात आणि पोलिस या घटनांमध्ये चौकशी करुन त्यांना शिक्षा देखील करतात.
परंतु जर पोलिसच असं काम करत असेतील तर? त्याच्या बायकोनं काय कारावं? अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये घडला आहे. येथे एका बायकोनं आपल्या नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मौजमजा करताना रंगेहात पकडले. या महिलेचा पती हा पोलिस निरीक्षक आहे.
महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या 'महिला शक्ती संगम कार्यक्रमात' हे पोलीस अधिकारी पाहूणे म्हणून सहभागी होणार होते. परंतु त्या आधीच त्याला हॉटेलमध्ये रंगेहात पकडले गेले. नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर बायकोने जोरदार हाणामारी सुरू केली.
हा संपूर्ण प्रकार कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्याठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अरुण कुमार (Arun Kumar) हे सोमवारी एका महिलेसोबत हॉटेलमध्ये मौजमजा करत होते.
त्याचवेळी फर्रुखाबाद येथून त्यांची बायको त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी आपला नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला (girlfriend) रंगेहात पकडले. त्यानंतर नवरा बायकोमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर पत्नीने यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) ठाणे इन्चार्जकडून तात्काळ अहवाल मागवला. पोलीस निरीक्षक त्यावेळी हॉटेल केडी पॅलेसमध्ये थांबले होते. यानंतर पोलीस निरीक्षकाला निलंबित (Suspend) करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणचा सखोल तपास कानपूर पोलीस करीत आहेत.