Fraud Marriage : एका अजब लग्नाची गजब गोष्ट समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली एका वराला लाखो रुपयांना लुबाडण्यात आलं. वराने लग्नात लाखो रुपयांचा खर्च केला, पण लग्नानंतर जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नापूर्वी एक मुलगी दाखवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात लग्न दुसऱ्याच मुलीशी लावून देण्यात आलं. राजस्थानमधल्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) ही फसवणूकीची घटना घडली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
जोधपूरमध्ये रहाणाऱ्या गंगा सिंह नावाच्या एका व्यक्तीने उम्मेद सिंह नावाच्या तरुणाचं आपल्या नात्यातील मुलीशी लग्न ठरवलं. इतकंच काय तर उम्मेद सिंहची त्या मुलीशी आणि तिच्या कुटुंबियांशी भेटही घालून दिली. मुलगी आणि मुलाने एकमेकांना पसंत केलं. दोघांच्या पसंतीने लग्न ठरलं आणि मुहूर्ताच्या दिवशी लग्नही लावून देण्यात आलं. लग्नात उम्मेद सिंहने पत्नीसाठी 2 तोळे सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, 40 तोळे चांदीचे दागिने दिले. आपल्या पत्नीसाठी त्याने नवा मोबाईलही घेतला.
या लग्नाबाबत गावात कोणालाही सांगू नका नाहीतर लग्न मोडू, असं गंगा सिंहने उम्मेद सिंह आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितलं होतं. ठरलेल्या दिवशी उम्मेद सिंह मोजक्या माणसांसह नागौरला आला. पण लग्नानंतर जेव्हा मुलाने मुलीचा चेहरा बघितला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं होतं ती ही मुलगी नव्हतीच.
तो तरुण वरात घेऊन नागौरला येऊ लागला, तेव्हा गंगा सिंग म्हणाला की, मुलीच्या कुटुंबात कोणीतरी म’र’ण पावले आहे, त्यामुळे तुम्ही वरातसह मंगलोडला या.
लग्न करणारी मुलगी कोण होती?
गंगा सिंहने मुलगा उम्मेद सिंहला मुलगी गरीब कुटुंबातील असल्याने लग्नाचा सर्व खर्च तुलाच करावा लागेल असं सांगितलं. ठरल्यानुसार उम्मेद सिंहने लग्नात तब्बल साडे तीन लाख रुपये खर्च केला. याशिवाय होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबियांना मदत म्हणून त्याने आणखी साडेसात रुपये दिले. हे सर्व पैसे उम्मेद सिंने कर्ज म्हणून घेतले होते.
लग्नानंतर उम्मेद सिंह आपल्या नववधूला घेऊन घरी आला. पण जेव्हा त्याने तिचा चेहरा बघितला तेव्हा त्याला धक्का बसला. आपलं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचं त्या मुलीने सांगितलं. आपण लग्नात चपात्या बनवायला आलो होतो, माझं नाव कांताबाई आहे. पण गंगा सिंहने आपल्याला धमकावलं आणि लग्न करण्यास भाग पाडल्याचं त्या मुलीने म्हटलं.
आपली मोठी फसवणूक झाल्याचं उम्मेद सिंहच्या लक्षात आल्यानंतर त्याने जोधपूर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. आरोपींविरोधात कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्या आलं असून उम्मेद सिंहने आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.