माता तू वैरिणी! अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईने केलं मुलासोबत अमानुष कृत्य

आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 

Updated: Aug 7, 2022, 01:41 PM IST
माता तू वैरिणी! अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईने केलं मुलासोबत अमानुष कृत्य title=
Crime news trending news mother killed his elder son with the help of lover and younger son in maratha

Crime:आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. स्वत:चे पाप लपवण्यासाठी एका आई आपल्या पोटच्या पोरासोबत अमानुष कृत्य केलं आहे. अवैध संबंध लपवण्यासाठी आईने प्रियकरासोबत (Lover) मुलाची हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील (Ghaziabad)आहे. मुलांची हत्या केल्यानंतरही या आईची क्रूरता इथेच संपली नाही. तिने मुलाच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याचा प्रायव्हेट पार्टसोबत असभ्य कृत्य केलं. यानंतर आपल्या लहान मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाचा मृतदेह जंगलात फेकून दिला. (Crime news trending news mother killed his elder son with the help of lover and younger son in maratha)

पती बेपत्ता झाल्याची तक्रार

या घटनेनंतर सूनेने आपल्या सासू, सासूचा प्रियकर आणि दिरावर पतीच्या हत्येचा आरोप केला. मुलाच्या हत्येनंतर आई, प्रियकर आणि लहान मुलाचा फरार होते. 15 दिवसांनंतर रस्त्यावर कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांच्या तपासाला गती आली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या लहान मुलाला ताब्यात घेतलं. महिलेची कसून चौकशी केल्यानंतर महिनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र अजून आरोपी प्रियकराचा शोध सुरु आहे. 

एसपी (ग्रामीण) इराज राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलैला मृत अनुज कुमार उर्फ समर बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने केली. 18 जुलैपासून तिचा पती बेपत्ता असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर 3 ऑगस्टला पत्नीच्या भावाने मेव्हणा अनुजचा मृतदेह दर्ग्याच्या मागे पडला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. 

तर तिघा आरोपींनी अनुजचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह दर्ग्याच्या मागे फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिला आणि तिच्या लहान मुलाला राज टॉकीज चौकाजवळ अटक करण्यात आली आहे. तर प्रियकराला लवकरच गजाआड करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.