CTET Answer Key: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (CBSE) माध्यमातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2022 सेशनच्या निकालाची आणि फायनल CTET ची उत्तरपत्रिका जाहीर करण्याची शक्यता आहे. सीटीईटीचा निकाल याच आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल घोषित झाल्यानंतर उमेदवार सीटीईटीच्या अधिकृत वेबसाईटवरुन म्हणजेच ctet.nic.in वरुन आपला निकाल डाऊनलोड करु शकतात.
सीटीईटी डिसेंबर 2022 रोजी झालेल्या या परिक्षेमधील पेपर हे 150 गुणांचे होते. उमेदवारांना प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 मार्क दिला जाईल. तर चुकीच्या उत्तरासाठी निगेटीव्ह मार्किंग होणार नाही.
उमेदवारांच्या माहितीसाठी, सीटीईटी 2023 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवगळे पासिंग मार्क आहेत. जनरल कॅटेगरीसाठी उमेदवारांना 60 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. तर राखीव कोट्यातून अर्ज करणाऱ्यासांठी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 55 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
अधिकृत नोटिफिकेशनुसार उमेदवाराला 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत सीटीईटी प्रोव्हिजनल उत्तरपत्रिकेविरुद्ध पुन:मूल्यांकन अर्ज करण्याची परवानगी होती. ही परीक्षा 28 डिसेंबर 2022 पासून 7 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा 243 केंद्रांवर देशातील 74 शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. सीटीईटी ची प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका 14 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली होती.