Currency Notes: आजपासून अनेक नियम बदलले; 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Reserve Bank Of India: आजपासून अनेक नियम बदलले, 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट समोर आली आहे. एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात 500 रुपयांबाबत भाष्य करण्यात आले आहे. याबाबत  RBI ने स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोटाबंदी होऊन जवळपास सात वर्षे होत आली तरी काही अफवा आजही पसरल्या जात आहेत.  तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Apr 1, 2023, 12:39 PM IST
Currency Notes: आजपासून अनेक नियम बदलले; 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट, हा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

Currency Note Latest News : मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदी केली होती. यादरम्यान सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. भारतात नोटाबंदी झाली. केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर भारतीय चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँकेने मोठी माहिती दिली आहे.

2 प्रकारच्या 500 रुपयांच्या नोटा बाजारात

500 च्या दोन प्रकारच्या नोटा बाजारात उपलब्ध आहेत आणि दोन्ही नोटांमध्ये फारच कमी फरक आहे. या दोन प्रकारच्या नोटांपैकी एक नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओतील नोट बनावट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खऱ्या नोटा कोणत्या आहेत, ते आम्ही सांगणार आहोत.

व्हिडिओमध्ये काय म्हटले होते?

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही 500 रुपयांची कोणतीही नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीतून जाते किंवा गांधीजींच्या फोटोच्या अगदी जवळ असते. या व्हिडिओमध्ये एक प्रकारची नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. पीआयबीने या व्हिडिओची सत्यता तपासली, त्यानंतर त्याचे सत्य समोर आले आहे. 

दोन्ही प्रकारच्या नोटा आहेत. मूळ व्हिडिओची सत्यता तपासणी केल्यानंतर हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटा असल्याचे समोर आले आहे. बाजारात चालणाऱ्या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत. तुमच्याकडे 500 ची नोट असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करु नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी देखील करु शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल . याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल : pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता .