मुंबई : दिवाळी अवघ्या आठवड्यावर ठेपली आहे. त्यामुळे सर्वच घराच्या साफसफाईला लागले आहेत. मात्र घराची संपुर्ण साफसफाई करणे, तेही इतर कामे संभाळून खुपच अवघड बाब आहे.काही गोष्टी साफ करण्यास संपुर्ण दिवस देखील जातो. त्यामुळे तुमचा वेळ वाया जातो. त्यामुळे झटपट साफसफाई कशी करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
घरातील पडद्यांची साफसफाई करायच म्हटलं तर संपूर्ण दिवस जातो. पहिला पडदे काढा मग ते धूआ, त्यांच्यानंतर ते सुकवा, यामध्ये तुमचा संपुर्ण वेळ जातो. मात्र ही धुण्याची झंझट सोडा आणि खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने पडदे साफ करून घ्या.
पडदे कसे स्वच्छ कराल
पडदे स्वच्छ करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे व्हॅक्यूम क्लिनरने साफ करणे. तुम्ही तुमच्या घराचे पडदे आठवड्यातून एकदा व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा. त्यामुळे त्यांच्यावर धूळ व घाण साचणार नाही. आणि पडदे नवीनसारखे चमकत राहतील.
पडद्यांसोबतच तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर किंवा कापडाने खिडक्याही साफ करा. यामुळे पडदे कमी घाण होतील. पडदे धुळीपासून वाचवण्यासाठी, आठवड्यातून एकदा तरी खिडक्या स्वच्छ करा.
जर पडदे व्यवस्थित साफ झाले असतील तर त्याला स्ट्रीम करून घ्या. पडद्यांना स्ट्रीम क्लीनरने साफ केल्याने घाण नाहीशी होईल आणि ते नवीन सारखी चमकेल.
आता तुमच्या खोलीचे पडदे सुगंधित करण्याची वेळ आली आहे. यासाठी पडदे स्वच्छ करा आणि पडद्यांवर काही चांगले आणि सुगंधी खोलीचे स्प्रे टाका. यामुळे घरात सुगंध दरवळेल.