Covid-19 : विंडो शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश नाही

अनलॉकच्या माध्यमातून अनेक नियम शिथील करत आणि खबरदारीचे उपाय पाळत अनेक  व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. 

Updated: Sep 27, 2020, 05:24 PM IST
Covid-19 : विंडो शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश नाही title=

लखनऊ : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी सर्व राष्ट्र प्रयत्न करत आहे. लॉकडाऊननंतर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनलॉकच्या माध्यमातून अनेक नियम शिथील करत आणि खबरदारीचे उपाय पाळत व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान लखनऊमध्ये विंडो शॉपिंग करणाऱ्यांना मॅलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. 

फक्त वस्तू विकत घेणाऱ्या ग्रहकांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश अधिकाऱ्यांनी दुकान मालकांना दिले आहेत. शिवाय वस्तू खरेदी करताना मास्क आणि हातमोजे घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोविडच्या दृष्टीने अन्य बाजारांसाठी तसेच दुकानांनाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

लखनऊचे जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश म्हणाले की, 'खबरदारीचा उपाय म्हणून नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मॅलमध्ये फक्त वस्तू खरेदी करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इतरांना मात्र मॉलमध्ये फिरता येणार नाही. शिवाय मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व मॉलमधील कर्मचार्‍यांना योग्य थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक आहे.'

मात्र मॉलमधील विक्रेत्यांना यावर नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा ग्राहक फिरतात वस्तू पाहतात तेव्हा एखादी वस्तू करतात. त्याचप्रमाणे कसं कळणार की कोणता ग्राहक वस्तू विकत घेण्यासाठी आला आहे. लोक विंडो शॉपिंग करूनच वस्तू खरेदी करतात अशी प्रतिक्रिया मॉलमधील विक्रेत्यांनी दिली.